Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्रलोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेतर्फे अभ्यास दौरा संपन्न

लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेतर्फे अभ्यास दौरा संपन्न

मुंबई(शांताराम गुडेकर) चिपळूण तालुक्यामधील नवीनच स्थापन करण्यात आलेल्या लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध समाजसेवी संस्थांना भेटी देण्याचे आयोजन केले होते.रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या अभ्यास दौऱ्यात संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण कासार, उपाध्यक्ष युयुत्सू आर्ते,विश्वस्त सत्यवान विचारे,सौ.सुविधा कासार,नेत्रा टोपरे, प्रमोद आंब्रे आणि सदस्य संतोष शिंदे यांनी वेगवेगळ्या संस्थांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते. या दौऱ्या अंतर्गत प्रथम देवरुख येथील सांदिपनी गुरुकुल कुडवली या संस्थेला भेट दिली.त्या ठिकाणी संस्थेचे अधिक्षक गुरव यांनी उपस्थितांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.त्यानंतर संस्थेबद्दल माहिती देताना या संस्थेमध्ये १८ वर्षापर्यंतच्या लहान मुलांचे संगोपन करून त्यांना शालेय शिक्षण सुद्धा देण्याचे काम ही संस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर देवरुख येथील मातृमंदीर या संस्थेला भेट देऊन तेथील संस्थेची माहिती घेतली.त्या ठिकाणी संस्थेच्या अधीक्षिका कुमारी अश्विनी कांबळे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली. त्यानंतर लांजा या ठिकाणी कै. श्रीमती जानकीबाई (आक्का )तेंडुलकर महिलाश्रम या संस्थेला भेट दिली. त्या ठिकाणी संस्थेच्या अधिक्षीका कुमारी ज्योती यादव यांनी माहिती देताना सांगितले की या संस्थेमध्ये १८ वर्षाखालील अनाथ मुलींचे संगोपन करून त्यांचे शिक्षण सुद्धा केले जाते. त्याचबरोबर येथील महिला आश्रमामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची सुद्धा राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस महात्मा गांधी व्यसनमुक्ती २०१६ चा पुरस्कार मिळालेल्या लांजा येथील "भारतीय कष्टकरी रयत" (भाकर ) या संस्थेला भेट दिली.या संस्थेमधील कार्याची माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी सांगितले की,या संस्थेमध्ये वृद्ध महिला व वृद्ध पुरुष यांच्या राहण्याची व जेवणाची सोय पूर्णपणे मोफत केली जाते.तसेच या ठिकाणी भेटी देणाऱ्या व्यक्तीला ९९ रुपयांत पोटभर जेवण आणि राहण्याची व्यवस्था केलेली असून कोकणातील पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा ही संस्था नावारूपाला आलेली आहे.यापुढे अशीच समाज उपयोगी कामे या संस्थेकडून चालू ठेवली जातील असेही त्यांनी सांगितले.‌ रात्री विश्राम गृहात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संस्था कशाप्रकारे कामकाज करतात याची माहिती या अभ्यास दौऱ्याच्या आयोजनातून मिळाली असे संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण कासार यांनी सांगितले.तर सर्व विश्वस्त आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments