Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकिरण मानेची राज ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका

किरण मानेची राज ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका

प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी राज्यात आणखी एका पक्षाची युती पाहायला मिळू शकते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच मनसे भाजपाशी हात मिळवू शकते, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून त्यांना लोकसभेची एक जागा मिळणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरुन अभिनेते व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे हे भाजपसोबत गेले तरी भाजपला त्याचा फायदा होणार नाही. राज ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची सर नाही. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या एका जागेसाठी ज्याप्रकारे लाचारी पत्कारली आहे, त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भुतकाळात घेतलेला निर्णय किती योग्य होता, हे आता पटत असल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे.

अभिनेते किरण माने यांची पोस्ट-

उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं ‘कॉपी पेस्ट’ नाही केले ! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले. स्वतःच्या ओरिजीनल शैली महत्त्वाची मानली. स्वतःचा म्हणून एक विचार जपला.

समजा एखादा अभिनेता महान आहे… जागतिक दर्जाचा आहे. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहीलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्याला, हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणार्या कलाकाराला कधीही देत नाहीत. त्याच्या गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते.

उद्धवजींनी ठरवलं असतं तर बाळासाहेबांचं नांव ‘कॅश’ करणं अवघड नव्हतं. साक्षात मुलगा आहे तो त्यांचा. “माझ्या उद्धवला सांभाळा” ही बाळासाहेबांची साद आजही मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली आहे. तरीही उद्धवजींनी काळाची पावलं ओळखून प्रबोधनकारांच्या हिंदूत्वाचं बोट धरलं. तिथंच ते जिंकले. आज बाळासाहेब असते तरी आजच्या अत्यंत नासलेल्या, सडलेल्या, विषारी भवतालात त्यांनी हेच केलं असतं

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments