प्रतिनिधी : “त्यांच्या बगलबच्चांना सांगा. तुझ्या साहेबाला फोन लाव मी माझ्या निलेश लंकेला फोन लावतो. आपण 365 दिवस काम करणारे माणसं. आम्हाला एकदा-दोनदा डिवचलं. मात्र आम्ही पण स्वाभिमान आहोत. मी माझ्या छातीवरचा वार घेऊ शकतो. मात्र कार्यकर्त्यांचे नाही. कोणी काही बोलू द्या. कमीत कमी दोन लाख मतांनी निवडून येणार. शिवसेनेना आणि काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना जाऊन भेटा, कोणी दुखावल गेले असती तर सांगा पदरात घ्या”, असं निलेश लंके म्हणाले.
“आज ते गोड गोड बोलतील. मात्र उद्या विचारणार देखील नाही. हे मोठे लोक आहे. पुन्हा पाच वर्ष ते फिरणार नाही. ते हिलेकॉप्टरमध्ये फिरतात. माझ्या गाडीचं डिझेल कार्यकर्ते टाकतात. अनेक लोक म्हणतात आमचं पाकीट येऊ द्या. मग आम्ही तुमच्या तंबूत. निलेश लंके मॅनेज होणारी अवलाद नाहीय मॅनेज हा तुमचा शब्द. 4 तारखेला लोक सांगतील डॉन कोण”, असं निलेश लंके म्हणाले.
“तुम्ही नगर दक्षिणचे खासदार, मात्र संरक्षण मंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, शासन आपल्या दारी, पशुसंवर्धनचे मोठे प्रदर्शन घेतलं, हे सगळे कार्यक्रम उत्तरला घेतले. तुम्हाला नगर दक्षिणच्या लोकांनी निवडून दिले. मात्र तुम्ही निधी उत्तरेला नेला. माझं काम वाढवलं होतं. अधिकारी म्हणाला मोठ्या साहेबांना प्रेझेंटेशन दाखवा. मी कलेक्टरला फोन लावला. माझ्या स्टाईलने बोललो. लगेच काम मंजूर झालं. लोक म्हणतात, मला इंग्रजी येत नाही. मात्र दिल्लीला गेल्यावर बघा कसं फाडफाड इंग्लिश बोलतो”, असं निलेश लंके यावेळी म्हणाले.
