Tuesday, April 22, 2025
घरमहाराष्ट्रसिद्धार्थ नगरच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग आक्रमक….

सिद्धार्थ नगरच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग आक्रमक….



सातारा(अजित जगताप) : महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २० मार्च रोजी पिण्याच्या पाण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहाची आठवण जतन करण्यासाठी सिद्धार्थ नगर मधील अनेक आंबेडकर अनुयायी चवदार तळ्याला भेट देतात. आज तीव्र उन्हाळा असूनही सिद्धार्थ नगर तालुका कोरेगाव येथील मागासवर्गीय बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थनगर ला पाणी न दिल्यास दिनांक १० जून २०२४ रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे.
धोम धरणामुळे पुनर्वसित झालेल्या सातारा जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजातील मौजे सिद्धार्थनगर, तालुका- कोरेगाव गावातील मागासवर्गीय समाजातील एकूण ३७७ लोकसंख्या असलेले १२५ कुटुंब पाण्यापासून वंचित असल्याबाबत चे लेखी पत्र दि:२१ डिसेंबर २३ रोजी उपअभियंता, पाणीपुरवठा उपविभाग कोरेगाव यांच्याकडे ग्रामपंचायत सिद्धार्थ नगर सरपंच व ग्रामसेवक यांनी सर्व कागदपत्रांसह जमा केले आहे. या गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवले जात असले तरी त्यामध्ये दुजा भाव केला जात आहे. सिद्धार्थ नगर गावासाठी पूर्वीच्या पाणीपुरवठा विहिरीला पाणी कमी असल्याने गावचा पिण्याचा पाण्याचा कायमचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत नवीन विहीर व पाईपलाईन मंजूर झाल्यास या गावचा कायमचा पाणी प्रश्न सुटेल, त्याकरिता ग्रामपंचायतीने जागेचा स्थळदर्शक नकाशा दिला आहे. कोरेगाव तहसीलदार कार्यालयातील लोकसंख्येचा दाखला, ग्रामसभेचा ठराव दिला आहे, आज ही कडक उन्हाळ्यातही दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धार्थ नगरच्या मागासवर्गीय ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. याच गावातील मतदारांचे मतदान व्हावे यासाठी पुरोगामी व कट्टर हिंदुत्ववादी राजकीय पक्षांनी प्रचार केला होता. आज त्या ठिकाणी कुणीही फिरकेना अशी स्थिती पाहण्यास मिळत आहे. गावच्या शेजारून पाण्याचा कालवा गेलेला आहे. पण सिद्धार्थ नगरच्या शेतकरी व शेतमजूर कष्टकरी यांच्यासाठी उपयुक्त नाही.
नवीन जागेत पिण्याच्या पाण्यासाठी नवीन विहीर खुदाई झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम सुटणार आहे. आदरणीय सातारा जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डूडी हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत . कोरेगाव तालुक्यातील भीम नगर व दरे गावचा प्रश्न त्यांनी तातडीने सोडविला आहे. सातारा जिल्हाधिकारी साहेबांनी सातारा जिल्ह्यातील अनेक मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून दिला .त्याचप्रमाणे कोरेगाव तालुक्यातील सिद्धार्थ नगर मधील मागासवर्गीय कुटुंबाला पाणी देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. अन्यथा दिनांक १० जून २०२४ रोजी पाऊस पडला तरी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सर्व कुटुंबासोबत ठिय्या आंदोलनास बसू असा इशारा दिला आहे.

यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांच्यासह सिद्धार्थ नगर मधील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान याबाबत सातारा जिल्ह्याचे निवास उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील यांना श्री रमेश उबाळे यांनी निवेदन दिले आहे त्याची तातडीने दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments