Thursday, April 17, 2025
घरमहाराष्ट्रभारतीय मसाल्यांची परदेशातील बदनामी थांबवा राष्ट्रीय निर्यातदार संघटनांची मागणी

भारतीय मसाल्यांची परदेशातील बदनामी थांबवा राष्ट्रीय निर्यातदार संघटनांची मागणी

प्रतिनिधी(रमेश औताडे) : ब्रँडेड मासाल्यामध्ये किटकनाशक अंश सापडल्याने सिंगापूर व हाँगकाँग या देशाने भारतातील एव्हरेस्ट व एम डी एच या मासाल्याबाबत नाराजी व्यक्त करत भारताला पत्रव्यवहार करत हे पदार्थ योग्य कसे ? असा सवाल केला आहे. यामुळे भारताची बदनामी झाली असल्याचा आरोप राष्ट्रीय स्तरावरील चार मसाला निर्यातदार संघटनांनी केला असून या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केली आहे.

इथिलिन ऑक्साईड हे किटकनाशक मसाले नाशवंत होऊ नये म्हणून जगभर प्रमाणात वापरण्याची मान्यता आहे. मसाले निर्यात करणारा भारत हा सर्वात मोठा देश असून 14 लाख मेट्रिक टन मसाले भारत निर्यात करतो.4 बिलियन ची आर्थिक उलाढाल या व्यवसायात आहे. सर्व ग्राहकाला शुद्ध माल देण्यासाठी भारताचे मान्यताप्राप्त प्राधिकरण कार्य करत असताना नाहक बदनामी करण्यासाठी हे एक षडयंत्र रचले जात आहे.असे निर्यातदार असोशीयशन चे अध्यक्ष हितेश गुतका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

इथिलिन ऑक्साईड चेप्रमाण कमी जास्त होण्याची अनेक कारणे आहेत. गोदाम मधून हाताळणी होताना, जहाजात संपर्कात येणारी वेगवेगळी कंटेनर, कामगारांची हाताळणी, मेडिकल पदार्थ स्पर्श, त्या त्या देशातील हवामान, अशी अनेक कारणे असताना व भारतीय अन्न पदार्थ प्राधिकरणाने निर्यात होताना खात्री करून प्रमाणित केल्यानंतर संबंधित देशांनी त्यांच्या प्रगोगशाळेत केलेल्या चाचणीचा दाखला देत भारतातील पदार्थ खराब असल्याचा अंदाज देणे हे कितपत योग्य आहे असा सवाल निर्यातदार असोशीयशन चे अध्यक्ष हितेश गुतका यांनी यावेळी केला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments