धारावी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना यांच्या वतीने धारावीतील मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट सामने खेळण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. हे सहाय्य युवासेना विभाग अधिकारी सन्नी सुभाष शिंदे यांच्या कडून विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी युवासेना कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवक व विधानसभा प्रमुख श्री. वसंत (आप्पा) नकाशे यांच्या हस्ते मूकबधिर विद्यार्थ्यांनी हे आर्थिक सहाय्य स्वीकारले.
या प्रसंगी युवा उपविभाग अधिकारी शिवा मैत्री, शाखा क्र. १८६ चे अधिकारी अजित बागडे तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपत, दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा युवासेनेचा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.
