प्रतिनिधी : निसर्गराजा महिला शेतकरी गट व शिवसमर्थ शेतकरी गट हे मोताळा तालुक्यातील कोथळी गावातून पहिल्यांना ‘फार्मर कप’ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच या शेतकऱ्यांनी माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा केला. त्यानंतर गावापासून जवळपास १२० किमी अंतर दूर जळगावच्या नॅचरली युवर्स बायोटेक लॅब मध्ये पाठवला. तिथे त्यांच्यासोबत एक आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट घडली.
“दोन्ही गटांतील शेतकऱ्यांच्या मातीचे २२ नमुने तपासायचे होते. गट असल्यामुळं याची जबाबदारी दोन शेतकऱ्यांनी घेतली आणि जळगावला गेले. तिथं त्यांनी ५०० रुपयांची फीमध्ये सवलत घेऊन ३०० रुपये घेतले. त्यामुळं एकूण ४४०० रुपयांची बचत झाली!” शेतकरी विनोद गणगे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सहकार्य करण्यामागचा हेतू सांगताना लॅबचे प्रमुख प्रमोद तेली म्हणाले, “सध्याच्या काळात माती परीक्षण गरजेचं आहे, पण अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. या काळात कोथळी गावाच्या गट एकत्र आले व स्वतःहून माती परीक्षण करून घेतलं. भविष्यातील शेतीसाठी ही खूप सकारात्मक बाब आहे. याचमुळे आम्ही शेतकऱ्याने सवलत दिली. मला ‘फार्मर कप’च्या शेतकऱ्यांचे प्रचंड कौतुक वाटते. भविष्यातही या शेतकऱ्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत.”
हे दोन्ही शेतकरी गट पहिल्यांदा शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतकरी करत आहे. पण, ही त्यांची फायद्याची शेती आहे असा त्यांना ठाम विश्वास आहे.