मुंबई : शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता धारावी कोळीवाडा येथे पाहणी दौऱ्यावर येणार असून परिसराची पाहणी करून होळी मैदान येथे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
या दौऱ्याची माहिती विभाग संघटक विठ्ठल पवार आणि विधानसभाप्रमुख वसंत नकाशे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, या भेटीदरम्यान मोठ्या संख्येने शिवसैनिक व धारावीतील नागरिक सहभागी होऊन ‘अदानी हटवा’ची मागणी करणार आहेत.
धारावी व परिसरातील सर्व शिवसैनिक तसेच मातोश्रीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.