Tuesday, April 29, 2025

उन्हाचा चटका हार्बर लाईनचा चाकरमान्यांना फटका

प्रतिनिधी :  गेले तीन ते चार दिवस जसा उन्हाचा पारा चढला आहे,उष्णतेच्या लाटांनी सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर गेले तीन दिवस रुळावरून रेल्वेगाडी घसरण्याचा प्रकार वाढल्यामुळे जे चाकरमानी मुंबई च्या दिशेने मंत्रालय, फोर्ट,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल,मस्जिद या विभागात पोटापाण्यासाठी येत असतात. मात्र मागील तीन ते चार दिवस या सततच्या मध्य हार्बर मार्गावर रेल्वे प्रवाशी यांचे प्रचंड हाल होताना बघायला मिळत आहे. वेळेत कोणतीच गाडी उपलब्ध नसल्यामुळे कामावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवार ३० एप्रिल पासून हा प्रकार सुरू आहे.

   संबंधित मार्गावर अजूनही रेल्वे गाड्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शुक्रवारी (आज ३ मे २०२४) अशीच अवस्था होती. रेल्वे गाड्याची लाईन लागत आहे,ज्या स्थानकावरून गाडी सुटते,त्याठिकाणी सुद्धा गाडी २० ते ३० मिनिटं उशिरा पोहचत आहेत. मध्यरेल्वे प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन प्रवाश्यांना होत असलेल्या त्रासाला मुक्त करावे अशी मागणी रेल्वे प्रवाशी करत आहेत. रेल्वेच्या डब्यात सध्या दबक्या आवाजात प्रशासनाला प्रवाशी शिवीगाळ करता आहेत. ‘रोज मरे त्याला कोण रडे’  अशी अवस्था हार्बर मार्गावर या तीन चार दिवसात बघायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments