मुंबई : अंतर्गत राजकारणाला कंटाळून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील महिला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश दिला. शिवसेना उपनेते आणि महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी राहुल शेवाळे यांच्यासह पत्नी सौ कामिनी राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. शिवसेना जिल्हा समन्वयक कैलास आरावडे यांनी घेतलेल्या पुढाकाराने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, जिल्हा उपाध्यक्ष सौ. आशाताई शिंदे, चेंबूर तालुका अध्यक्ष सौ. किरण आलटे, जिल्हा सचिव हरणाबाई लोखंडे, उषा कांबळे, प्रमिला सिंग, पुष्पा डावरे, वर्षा पारधे, ज्योती चंद्रमोरे, लीना सुतार,कल्पना पवार आणि अन्य महिला पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
