प्रतिनिधी : तिकिटासाठी रांगेत ताटकळत उभं राहण्याची आता गरज नाहीय. रेल्वेने एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. रेल्वेने युटीएस अॅपमध्ये बदल केले आहेत. त्यामुळं आता प्रवाशांना रांगेत उभं न राहताही प्लॅटफॉर्मवरच लोकलचे तिकिट काढता येणार आहे. रेल्वेने केलेल्या या बदलामुळं अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी रेल्वेने हा बदल केला आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्य शहरांतील नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे. रेल्वेने युटीएस अॅपवर तिकिट काढण्यासाठी संपूर्ण देशातील रेल्वे रूळांसाठी जिओ फेसिंग केली आहे. कारण लोक ट्रेनमध्ये चढल्यानंतर टीटीला बघून तिकिट काढू शकतात. त्यामुळं रेल्वे रूळांपासून 20 किमी अंतरावर असताना अॅपमधून तिकिट काढण्याची मर्यादा होती. मात्र आता त्यात बदल करुन ही मर्यादा शून्य केली आहे. म्हणजेच प्लॅटफॉर्म उभं राहूनही तुम्ही तिकिट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला स्थानकाच्या बाहेर जावं लागणार नाही. अनारक्षित तिकिट काढण्यासाठी युटिएस अॅपमधून तिकिट काढण्यासाठी तुम्हाला युटीएस अॅप डाउनलोड करावं लागेल. हे अॅप अँड्रोइड आणि IOS प्लॅटफॉर्मवरून डाइनलोड करु शकतात. जर तुमच्याकडे अँड्रोइड फोन आहे तर प्ले स्टोअर मधून हे अॅप डाउनलोड करु शकता. युटीएस अॅपमधून तिकिट काढताना दोन पर्याय आहेत. पहिला पेपरलेस म्हणजेच अॅपमधूनच तुम्ही टीटीला तिकिट दाखवू शकता. तर, दुसरा पर्याय प्रिंटेड तिकिट त्यासाठी तुम्हाला अॅपमधून रेल्वे स्थानकात लावलेल्या ऑटोमॅटिक वेंडिग तिकिटमधून पेपर तिकिट प्रिंट करु शकतात.
आता रेल्वे प्लॅटफॉर्म वर उभे राहून तिकीट काढता येणार
RELATED ARTICLES
अब अयेगा मजा एक प्राध्यापक एक वकील तुल्यबळ उमेदवार बघू या कोण बाजी मारते वर्षाताई चे पारडे जड