प्रतिनिधी : जी/उत्तर विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेक्शन च्या कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीम. राधिका साळवी-अहिरे या सेनापती बापट रोडवर असणार्या डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर या सेक्शन मध्ये गेली४/५ वर्षं क.पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.
रस्त्यांची साफसफाई करुन, उच्च दर्जाची स्वच्छता राखणे, झोपडपट्टी मधील कचरा रस्त्यावर येऊ न देणे,हाऊस टू हाऊस ही महानगरपालिकेची सेवा देणे, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले मीनाताई फुल मार्केट,मच्छिमार्केट इत्यादी ठीकाणावरुन येणार्या कचर्याचे नियोजन करून जागच्या जागी कचरा अडवून विभागातील उच्च दर्जाची स्वच्छता ठेवली आहे.
अनधिकृतपणे कचरा टाकणार्यांवर तसेच फेरीवाल्यांवर आतापर्यंत रू १००००/- ची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील एल्फिन्स्टन उड्डाण ब्रिज खाली अनेक वर्षांचा राडारोडा उचलून विभाग कचरा, राबित, डेब्रिज ऑड आर्टिकल मुक्त केल्यामुळे स्थानिक सामाजिक संस्था श्री पवनपुत्र सेवा संघ या संस्थेने श्रीम.राधिका साळवी -अहिरे यांचा यथोचित सन्मान करून गौरविणेत आले.
श्रीम राधिका साळवी-अहिरे यांच्या आदर्शवत कामगिरीमुळे विभागातून त्यांचे अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
राधिका साळवी-अहिरे यांची यशस्वी कामगिरी साठी समुप श्री.हेमंत घाटगे, पर्यवेक्षक श्री रत्नकांत सावंत आणि राजेश भावसार यांचे मार्गदर्शन तसेच एम एल क.पर्वेक्षक श्री शामजी परमार तसेच प्रशांत आचरेकर यांचे सहकार्य मिळाले.
श्रीम राधिका साळवी-अहिरे यांनी स्वच्छ केलेल्या विभागात लहान मुलांसाठी प्ले-ग्राउंड स्थानिकांनी बनविल्या मुळे श्रीम.राधिका साळवी-अहिरे यांच्या कामगिरीचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
