प्रतिनिधी : सालाबाद प्रमाणे याही वर्षी शुक्रवारी मोटर लोडर विभाग सकाळपाळी सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती तसेच सामाजिक क्रांतीचे महामेरू ईतर महापुरुष तसेच महामाता इत्यादींची जयंती आनंदी वातावरणात संपन्न झाली.
सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुध्द पुजा घेण्यात आली.
तदनंतर महापुरुषांच्या नावांचा जयजयकार करण्यात आला.
या प्रसंगी सकाळसत्रातील प्रमुख पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती केदारे यांनी उपस्थितांना संबोधित करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक क्रांती आणि भारतीय संविधान यावर प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले
या प्रसंगी प्रमुख पाहुणे समुप श्री हेमंत घाटगे पर्यवेक्षक श्री रत्नकांत सावंत क.पर्यवेक्षक शामजी परमार, प्रशांत आचरेकर, प्रशांत सवाखंडे, विजय कांबळे, संदेश मटकर
तसेच कार्यालयीन कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.
दुपारी १.३० वाजता सर्व कर्मचारी, अधिकारी व प्रमुख पाहुणे यांनी सहभोजन घेऊन सामुहिक नृत्य करुन जयंतीचा आनंद द्विगुणित केला.
या नृत्यामध्ये क.पर्यवेक्षक श्री प्रशांत आचरेकर आणि संदेश मटकर सरस ठरले.
शेवटी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी नंदकुमार जाधव,मनोहर सकपाळ यांनी उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जी/उत्तर मोटर लोडर विभाग (सकाळ पाळीमध्ये) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ईतर महापुरुष तसेच महामाता यांचा संयुक्त जयंती उत्सव आनंदी आणि मोठ्या उत्साहात संपन्न!
RELATED ARTICLES