Thursday, April 17, 2025
घरमहाराष्ट्रनिवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चंद्र प्रकाश मीना व राहील गुप्ता हे २५...

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चंद्र प्रकाश मीना व राहील गुप्ता हे २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात दाखल

ठाणे(प्रतिनिधी) :   २५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी श्री. चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) व श्री. राहिल गुप्ता (आयआरएस) यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने या दोघांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. श्री. चंद्र प्रकाश मीना व श्री. राहील गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. श्री. चंद्र प्रकाश मीना हे भारतीय महसूल सेवेतील (IRS) २०१० च्या बॅचचे अधिकारी आहेत. श्री. मीना हे २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील १४८ – ठाणे, १५० – ऐरोली, १५१ बेलापूर या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील.
श्री. गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील (IRS) २०१२ च्या बॅचचे अधिकारी असून ते २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील १४५ मिरा-भाईंदर, १४६ ओवळा-माजिवडा, १४७ कोपरी-माजिवडा या विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असतील.
वरील दोन्ही निरीक्षक हे आज २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत.

खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ
२५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांना शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. उपरोक्त अधिकाऱ्यांचे मतदार संघातील संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहे.
केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. चंद्र प्रकाश मीना यांचा संपर्क क्रमांक ८३६९०४५८२४ असा असून ईमेल आयडी Expobserver२५pc@gmail.com असा आहे. तर श्री. गुप्ता यांचा संपर्क क्रमांक ८७७९०२६९१४ असा असून Exp.observer.pc२५@gmail.com हा त्यांचा ईमेल पत्ता आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments