Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रपरिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक कर्नाटक दौऱ्यावर - परिवहन सेवेची माहिती घेणार..!

परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक कर्नाटक दौऱ्यावर – परिवहन सेवेची माहिती घेणार..!

मुंबई (१ फेब्रुवारी) : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक हे १ व २ फेब्रुवारी रोजी दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर जात असून तेथे ते कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेची माहिती घेणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, श्री.नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व श्री . नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) हे अधिकारी देखील दौऱ्यात सहभागी होत आहेत. *या दौऱ्याच्या दरम्यान कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री श्री .रामलिंगा रेड्डी यांच्यासोबत देखील मंत्री सरनाईक यांची बैठक होणार असून दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.*
सन्माननीय पंतप्रधान श्री. ‌नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा! जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या गरुडा, ऐरावत, अंबारी यासारख्या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या सेवेची माहिती करून घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली असून इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का! याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली जाणार आहे.

(अभिजीत भोसले)
जनसंपर्क अधिकारी
मा.मंत्री, परिवहन

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments