ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

सौ.रेश्मा डाकवे समाजभूषण आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील सौ.रेश्मा संदीप डाकवे यांना समाजभूषण बाबुराव गोखले वाचनालयाच्यावतीने राज्यस्तरीय समाजभूषण आदर्श महिला गौरव पुरस्कार देवून कराड आगारप्रमुख शर्मिष्ठा पोळ, कराडच्या माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे व अन्य मान्यवर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिजित इंगळे, नितीन निंबाळकर, प्रा.गणेश लोहार, साहित्यिक बसवेश्वर चेणगे, राजेंद्र जंगम, अविनाश रोडे, चंद्रशेखर पाटील ग्रंथपाल रुक्साना नदाफ, सीमा कांबळे वाचक सभासद व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
सौ.रेश्मा डाकवे ह्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव आहेत. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट गेली 9 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. या कार्याची दखल घेत महिला दिनाचे औचित्य साधत त्यांना सदर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
‘‘या पुरस्कारामुळे ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत समाजाप्रती केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव झाला आहे. तसेच यामुळे समाजात काम करताना आणखी जबाबदारीने काम करावे लागेल. स्पंदन ट्रस्ट ला विविध उपक्रमांसाठी वेळोवेळी कळत नकळत मदत केलेल्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. पुरस्कारामुळे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या कर्तृत्वावर अभिमानाची मोहोर उमटली आहे्र’’ अशी भावना ट्रस्टच्या सचिव सौ.रेश्मा डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.
यापूर्वी रेश्मा डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, माॅंसाहेब जिजाऊ इ.पुरस्कार मिळाले आहेत. राज्यस्तरीय समाजभूषण आदर्श महिला गौरव पुरस्काराबद्दल सौ.रेश्मा डाकवे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.दादाराम साळुंखे यांनी केले. तर आभार ग्रंथालयाच्या अध्यक्षा कांचन धर्मे यांनी मानले

Scroll to Top