Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रअंधराकडून प्रकाशाकडे वेळापूर युवा मंडळाचा सौर ऊर्जा प्रकल्प; सर्व स्तरातून होतेय कौतुक

अंधराकडून प्रकाशाकडे वेळापूर युवा मंडळाचा सौर ऊर्जा प्रकल्प; सर्व स्तरातून होतेय कौतुक

प्रतिनिधी : कोयना सोळशी कांदाटी या विभागातील वेळापूर गावी युवा मंडळ पाटीलवाडी मुंबई आणि पाटीलवाडी वेळापूर मधील ग्रामस्थांच्या सहकार्याने एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्याची पंचाहत्तरी ओलांडली असली तरी अजूनही काही गावे अंधारात आहेत. ज्या विभागातून कोयनेचा उगम होतो. अशा अनेक भागात आजही अंधार पसरला आहे. यासाठी समाजाला आपण काहीतरी देणं लागतो असे दायीत्व असलेले काही सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्या सहकार्याने वेळापूर गावामध्ये १८ एल ई  डी (सौर ऊर्जा यंत्र) बसविण्यात आली.यासाठी ५० हजार रुपये खर्च करून हा सौर ऊर्जा प्रकल्प राबवला. आणि ज्या भागात अंधार पसरला होता. तेथे आता प्रकाशमय असे वातावरण झाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद बघायला मिळत होता. हे सर्व एकीचे बळ म्हणावें लागेल. मुंबईकर युवा मंडळ पाटील वाडी यांनी आपल्या गावाला अंधारातून प्रकाशाकडे आणल्याचा तो आनंद होता. नव्या पिढीला एक आदर्श घालून देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments