Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्ररामदास आठवलेंनी केली प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीची चौकशी

रामदास आठवलेंनी केली प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीची चौकशी

मुंबई (रमेश औताडे) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सोमवारी वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश अंबेडकर यांच्या प्रकृतीची दूरध्वनीद्वारे चौकशी केली.

प्रकाश अंबेडकर यांना पुण्यातील रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या पत्नी अंजलिताई प्रकाश आंबेडकर यांनी ना.रामदास आठवले यांना दिली.

पुण्यात जाऊन लवकरच आपण प्रकाश अंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी अंजलीताई अंबेडकर यांना सांगितले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते ऍड.प्रकाश आंबेडकर
यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर ना. रामदास आठवले यांनी अत्यंत काळजीने प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची चौकशी दूरध्वनी द्वारे केली.

आता अँड.प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर आहे.त्यांची अँजीयोप्लास्टी करण्यात आली असून आता त्यांची प्रकृती चांगली आहे ऍड. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती लवकर चांगली व्हावी अशा शुभेच्छा देऊन लवकरच पुण्यातील निवासस्थानी आपण ऍड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments