मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने माहिम विधानसभेतून आपल्या पक्षाची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजप, शिवसेना शिंदे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे यांना दादर-माहीममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवसेना भवन असलेल्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानेही विभाग प्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता दादर-माहीममधील लढत हायव्होलेटज लढत झाली आहे. अमित ठाकरे यांच्यासोबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेतील बंडात एकनाथ शिंदे यांना साथ देणारे आमदार सदा सरवणकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तर, आता ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून विभागप्रमुख महेश सावंत आणि प्रकाश पाटणकर यांच्या नावाची चर्चा होती. अखेर शिवसेना पक्षप्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभादेवी-दादरमध्ये शिवसेनेतील फुटीनंतर महेश सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.