ताज्या बातम्या

काळाची गरज असणारा व पत्रकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ड्रोन व्यवसाय

मुंबई : पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणाऱ्या मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकारांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. आगामी काळाची गरज असणारा व पत्रकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ड्रोन व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा पत्रकार संघात शनिवारी आयोजित केली होती.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी पत्रकारांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांना नोकरी सोबत व्यवसाय कसा करता येईल यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोशियशन, टीव्हीजेए,मुंबई प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने संयोजक व मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य राजेश खाडे, शैलेंद्र शिर्के, अंशुमन पोहरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.ड्रोन वल्ड कंपनीचे अध्यक्ष विनोद पाटील,दर्शन शहा,राहुल अंबेगावकर,निलोफर लाखनी यांनी या कार्यशाळेत ड्रोन व्यवसाय संदर्भात माहिती दिली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top