Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमोर्डे घाटकर वाडी आणि ओझरे खुर्द येथील मुंडेकर वाडी यांच्यामध्ये फुगड्या- टिपऱ्याचा...

मोर्डे घाटकर वाडी आणि ओझरे खुर्द येथील मुंडेकर वाडी यांच्यामध्ये फुगड्या- टिपऱ्याचा जंगी सामना लाखणवाडी संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर ) : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखाणवाडी येथील रहिवाशी सुरेश गंगाराम करंबेले,महेश गंगाराम करंबेले,रमेश गंगाराम करंबेले या बंधूतर्फे त्यांच्या वडिलांच्या महाल निमित्त मोर्डे घाटकर वाडी आणि ओझरे खुर्द येथील मुंडेकर वाडी यांच्यामध्ये फुगड्या- टिपऱ्याचा जंगी सामना सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून ठेवण्यात आला होता.या सामन्याचा बामणोली,मारळ,बोंड्ये,कासार कोळवण,निवे खुर्द,आंगवली,सोनारवाडी येथील रसिकांनी लाभ घेतला.हा कार्यक्रम चैतन्य युवा मंडळ सभागृहच्या मैदानात पार पडला.त्याचबरोबर पाटगाव येथील भजनाचा कार्यक्रमही पार पडला. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाडीतील सर्व मंडळी आणि सर्व नातेवाईक यांनी हात भार लावला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments