Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसातारा शहरात कंप्रेसर स्फोटाने एक ठार तर दोन गंभीर जखमींवर उपचार सुरू

सातारा शहरात कंप्रेसर स्फोटाने एक ठार तर दोन गंभीर जखमींवर उपचार सुरू

सातारा(अट जगताप) : सातारा शहरातील नगरपालिका ते माची पेठ रस्त्यावरील एका वाहन सर्विसिंग व दुरुस्ती सेंटर मध्ये कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाला .यामध्ये एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झालेले आहेत. सातारा शहरामध्ये बुधवार दिनांक २ ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता छत्रपती राजघराण्यातील अदालत वाडा नजीकच्या एका वाहन सर्विसिंग सेंटर मध्ये मुनीर पालकर वय ३५ रा. गुरुवार परज, सातारा व हरून बागवान व उमर बागवान हे काम करत होते. अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे सर्विसिंग सेंटर मधील कंप्रेसरचा स्फोट होऊन मुनीर पालकर वय -३० हे उंच उडून रस्त्यावर कोसळून पडले. त्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. तर सेंटरमध्ये बसलेले हरून व उमर बागवान हे गंभीररित्या जखमी झाले . सदरची घटना दुपारी घडल्यामुळे या दाहकतेने परिसरातील काही इमारतीच्या खिडकीच्या काचा फुटून मोठा आवाज झाला. सदरची घटना घडल्यानंतर घटनास्थळी सातारा पोलीस दल बॉम्बस्फोट व श्वान पथक दाखल झाले .पोलिसांना या ठिकाणी झालेली गर्दी दूर करण्यास सुरुवात केली. दुर्घटनेनंतर या परिसरात पांढऱ्या रंगाचा धूर पसरला होता . नेमकं काय घडले ? यासाठी स्थानिक रहिवाशी व वाहन चालक घाबरून एकमेकांना विचारपूस करत होते. या घटने नंतर तातडीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली . यावेळी सातारचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे. तर या अपघातात मुनीर पालकर हे ठार झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुपारच्या वेळी सदरचा घटना कशामुळे झाली ?त्याचा तपास सातारा पोलीस यंत्रणा करू लागली आहे.


RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments