Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकोकणात सर्वात मोठी राजकीय घडामोड; निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

कोकणात सर्वात मोठी राजकीय घडामोड; निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

मुंबई(विवेक पाटकर): रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात ‘हाय व्होल्टेज’ लढत झाली. या लढतीत अखेर भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी बाजी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणात राणेंची ताकद वाढली आहे.

अशातच आता नारायण राणेंनी त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. २०१४, २०१९ या दोन सलग निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले निलेश राणे मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहे.

माजी खासदार आणि आक्रमक नेते निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा कोकणसह महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरू लागली आहे.या चर्चेचं कारण म्हणजे भाजप खासदार नारायण राणे यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या मतदारसंघावर निलेश राणे यांच्यासाठी भाजपाचा दावा आहे. मात्र, जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून कुडाळ-मालवणचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

खासदार नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात आज बुधवारी नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत निलेश राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची आणि हा तोडगा निघाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचा विचार करता,येथे ठाकरे गटाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राऊत यांना मोठं मताधिक्य मिळणं गरजेचं होतं. मात्र, मतमोजणीचा निकाल पाहता कुडाळ-मालवणमधून राणेंना ७९ हजार ५१३ मते, तर राऊत यांना ५३ हजार २७७ मते मिळाल्याचं दिसून आलं.

कुडाळ-मालवण मतदारसंघातून राणे यांना मिळालेलं मताधिक्य पाहता येत्या काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

निलेश राणे हे भारतीय जनता पार्टी मधील एक राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत.ते पंधराव्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले होते.शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी त्यांचा २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments