प्रतिनिधी – खांबदेव तरुण मित्र मंडळाचे यंदाचे ५५ वे वर्ष असून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवणारे तसेच महाराष्ट्रावर आलेले कोण कोणतेही संकट असो,यावेळी प्रथम धावून जाऊन मदतीचा हात पुढे करणारे मंडळ म्हणून नावलौकिक असलेले हे मंडळ वर्षभर सतत नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर,चष्मा शिबिर, मुलांच्या शिक्षणासाठी मोफत करिअर,शालेय वस्तू वाटप,स्पर्धा परीक्षा,महिलांसाठी विविध उपक्रम, हळदी कुंकू समारंभ,आदिवासी पाडा येथे दिवाळी मध्ये दिवाळी फराळासोबत कपडे,जीवनावश्यक वस्तू वाटप करण्याचे कार्य सतत सुरू असते,मंडळ नेहमी एक पाऊल पुढे राहून आपली सामाजिक बांधिलकी जोपासत असते,मंडळाचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता,प्रचंड मेहनत घेऊन हे समाजहित जपत असतात.यावर्षी मंडळाने महिलांवरील अत्याचार हा समाजप्रबोधन करणाऱ्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मंडळाचे अध्यक्ष विलास बागडे,सचिव कुंडलिक बिटले,खजिनदार अनिल यादव, त्याचबरोबर संतोष लिंबोरे,हनुमान माने,रुपेश शिखरे,संजय धुमाळ,संदीप कदम,रवी डोईफोडे,ज्ञानेश्वर टिके,अनिल यादव आणि इतर सर्वजण हा गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेत असतात. महिलांच्या हळदी कुंकू समारंभाला धारावी पोलीस ठाणे मधील सर्व महिला पोलीस अधिकारी उपस्थित होत्या.
