वाई (प्रतिनिधी) : वाई तालुक्यातील अर्भक मृत्यू आणि बाल मृत्यू ,माता मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी ओटी सुरक्षित मातृत्वाची हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात तपासणी ,आहार, समुपदेशन आणि प्रबोधन होणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीकडून शुक्रवार दि.,१३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ पासून हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले.

वाई तालुक्यात जुलै२०२४ अखेर १२ अर्भक मृत्यू व ०१ माता मृत्यू झालेने दि.१ ऑगस्ट रोजी पंचायत समिती सभागृहात बाल मृत्यु अन्वेशन सभेचे आयोजन केले होते. अर्भक मृत्यू, बाल मृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण
रोखण्यासाठी तालुक्यात प्रभावी उपाय योजना संपूर्ण तालुक्यात ” ओटीसुरक्षित मातृत्वची” कार्यक्रम दि. १३ ऑगस्ट रोजी रोजी सकाळी ९.०० पासून गावनिहाय मेळावे, तपासणी, उपचार,संदर्भ सेवा, समुपदेशन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, एकात्मीक बालविकास प्रकल्प यांचे सहकार्याने हा कार्यक्रम होणार असल्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले.