ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

ज्ञानसागर शिक्षण संस्था संचालित किड्स वर्ल्ड प्री स्कुल चा स्नेहसंमेलन आणि गुणगौरव सोहळा १५ मार्चला

नवी मुंबई : ज्ञानसागर शिक्षण संस्था (रजिस्टर.) संचालित किड्स वर्ल्ड प्री स्कुल नवी मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, गुणगौरव समारंभ आणि समाजातील विशेष व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत प्लाॅट नं २१०, सेक्टर १, शिवनेरी ड्रायव्हींग स्कूल च्या बाजूला, नवी मुंबई येथे पार पडणार आहे.
लहानग्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना , कर्तृत्वाला वाव व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महीला दिनाचे औचित्य साधुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कला सादरीकरणासह बक्षीस वितरण आणि नगरीक संरक्षण दलातील घणसोली विभागातील महिला स्वयंसेवकांना ओळख पत्रक वाटप असा समारंभही होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अजय दहीवले उपस्थित राहणार आहेत. तसेच मान्यवर म्हणून श्री. रमेश शिवशरण सर (डिफेन्स -रिटायर सुभेदार आणि हिंदुस्तान पेट्रोलियम रिटायर सिनीयर माॅनेजर) उपस्थित राहणार आहेत.
महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सत्कारही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यामध्ये सौ. राजश्री राजेश देशमुख, सौ.वर्षा दिपक खराडे, सौ. पुनम प्रमोद खंडागळे, सौ. भुमिका रोहीत पांचाळ, सौ. प्रतिभा शिवशरण आदींचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रक सुस्मित शिवशरण (सचिव), सौ. सानिका शिवशरण(सल्लागार) आदी कार्यरत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष सौ. नम्रता दहीवले यांनी सर्व पालक, नागरिक तसेच मित्रमंडळींनी उपस्थित राहून लहानग्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

Scroll to Top