ताज्या बातम्या

वेतनवाढ नसतानाही कामगारांच्या चेहऱ्यावर स्माईल

मुंबई ( रमेश औताडे) : महाराष्ट्राची लाल परी एसटी महामंडळातील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर काही काळ का होईना स्माईल दिसू लागली आहे. वेतनवाढ व भरघोस बोनस मिळाल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा जरी आनंद झाला नसला तरी काही काळ कामगार हसून एकमेकांना टाळी देत आहेत.

ठाण्याचे विठ्ठल राठोड, बुलढाण्याचे अशोक वाडिभस्मे आणि सोलापूर चे विनोद भालेराव या तीन एसटी महामंडळातील विभागीय अधिकाऱ्यावर कामगारांच्या बढती व बदलीसाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून त्यांचे अधिकार गोठवले आहेत. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी लेखी आदेश देत हि कारवाई केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

काही वरिष्ठ अधिकारी आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास देत असतात. त्यांच्या विरोधात बोलने म्हणजे नोकरी गमावणे किंव्हा दूर ठिकाणी बदली होणे. अशी अवस्था कामगारांची असते. या पार्श्वभूमीवर महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी कामगारांना सहकार्य केले असल्याचे चित्र आहे.

तसेच आता या पुढचे पाऊल म्हणजे, उत्कृष्ट कामगारांचा सन्मान कार्यक्रम म्हणजे कामगारांचा हुरूप आणि जोम वाढवणारा आहे. वाहक चालक व इतर कामगारांना अनेक संकटांचा सामना करत कर्तव्य पार पाडावे लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी कामगार कोणत्याही संकटाचा सामना करत आपले कर्तव्य पार पाडत असतात. असे कामगार दुर्मिळ असतात मात्र त्यांना योग्य तो सन्मान दिला तर त्यांना अजून हुरूप येतो. दोन दोन महिने पगार उशिरा मिळाला तरी आंदोलन न करता आपले कर्तव्य पार पाडणारे कामगार महामंडळात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top