Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी.." कामगार पालक दिना " चे आयोजन

एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी..” कामगार पालक दिना ” चे आयोजन

मुंबई : स्थानिक पातळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या छोट्या-मोठया समस्या तात्काळ सोडविण्यासाठी विभाग नियंत्रक यांनी दर सोमवारी व शुक्रवारी विभागातील एका आगारात जाऊन ” कामगार पालक दिन ” घ्यावा. ज्यामध्ये आगारातील चालक- वाहक, यांत्रिक कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी ऐकून घेऊन तिथेच तातडीने निराकरण करावे, अशा सूचना एसटी महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटीच्या स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार १५ जुलै,२०२४ पासून दुपारी ३ ते ५ या वेळे ” कामगार पालक दिन ” आयोजित करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळात सध्या सुमारे ९० हजार कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळ हे खऱ्या अर्थाने ९० हजार कर्मचाऱ्यांचे विशाल कुटुंब आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा समाधानी असेल तर त्याची मानसिक स्थिती उत्तम राहते. त्यामुळे तो आपल्या कर्तव्यामध्ये शंभर टक्के योगदान देऊ शकतो. स्थानिक पातळीवर चालक- वाहक, यांत्रिकी कर्मचारी यांना रजा, डयुटी, वेळापत्रकातील त्रृटी, बदल्या, बढत्या, वरीष्ठांची कार्यपद्धती, विश्रामगृह, तेथील स्वच्छता या बाबतीत अनेक तक्रारी वजा समस्या असतात. या तक्रारी आपल्या वरिष्ठांनी ऐकून घ्याव्यात व त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी त्यांची किमान अपेक्षा असते. कर्मचाऱ्यांचे अनेक किरकोळ प्रश्न केवळ योग्य अधिकाऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने अनुत्तीर्ण राहतात. यावर उपाययोजना म्हणून विभाग नियंत्रक यांनी त्यांचे “पालक” बनुन त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात व तातडीने त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून दैनंदिन कामाबाबत असलेल्या छोट्या मोठ्या समस्या व तक्रारी मुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होणारी अशांतता संपुष्टात येईल. त्यांची मानसिक स्थिती सुदृढ राहिल व ते कामाच्या ठिकाणी उत्साहाने कार्यरत राहतील. हा या ” कामगार पालक दिनाचा ” मुख्य उद्देश आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments