कोल्हापूर(अजित जगताप) : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार निमित्त कोल्हापूर या ठिकाणी उपस्थित शिक्षकांनी हात वर करून पाठिंबा दर्शवला. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनी कौस्तुभ गावडे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने शिक्षकांच्या प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर संवाद आणि समन्वय साधण्याच्या दृष्टीने या पाठिंब्याला महत्त्व प्राप्त झाले . महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीशी सात हजारहून अधिक शिक्षक संबंधित आहेत. पुणे विभागातील सातारा- सांगली- सोलापूर- कोल्हापूर- पुणे या जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघाचा प्रतिनिधी हा शिक्षकांच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावीपणे मांडणारा असावा अशी अपेक्षा उपस्थित शिक्षकांनी केली.
जुनी पेन्शनचा प्रश्न सोडविण्यासाठी लढत राहून शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याची प्रसंगी लढा उभारण्याची जबाबदारी शिक्षक आमदारांनी समर्थपणाने पेलावी. अशी उपस्थित शिक्षकांनी अपेक्षा व्यक्त केली. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील विविध शिक्षक व कर्मचारी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहेत. या मागणीच्या अनुषंगाने शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या भावना आणि अपेक्षा शासनापर्यंत पोहोचविणे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे तो सोडवण्यासाठी शिक्षक आमदारांनी आपली ताकद लावावी. यासाठी शिक्षक मतदार सुद्धा पाठपुरावा करतील.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने जाहीर पाठिंबा श्री कौस्तुभ गावडे यांना दिला आहे. हा शिक्षकांच्या प्रश्नांवरील संवादाला महत्त्व देणारा मानला जात आहे.
शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. जुनी पेन्शन मिळविण्याच्या मागणीसाठी निर्णायक लढा उभारण्याबरोबरच शिक्षकांचे सेवाविषयक प्रश्न, अशैक्षणिक कामांचा भार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करणार,” अशी ग्वाही कौस्तुभ गावडे यांनी दिली……………………………….. फोटो कोल्हापुरी ते शिक्षकांनी हात वर करून पाठिंबा दर्शवला (छाया- अजित जगताप, कोल्हापूर)




