ताज्या बातम्या

ज्येष्ठानी आपल्या मालमत्येचे इच्छापत्र करावे- अँड. निर्मला सामंत प्रभावळकर

मुंबई (बाळ पंडित /शांताराम गुडेकर ) : “ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अत्याचार, मन:ताप, त्यांचे शारीरिक व मानसिक आजार, हे समाजात नित्याचे झाले आहे. भविष्याची तरतूद म्हणून ज्येष्ठानी आपल्या मालमत्तेची इच्छा पत्रात नोंद करावी. पण दानपत्र करू नका, कारण दानपत्र बदलता येत नाही.” असे अँड . निर्मला सामंत -प्रभावळकर यांनी सांगितले, सामाजिक न्याय व सक्षमीकरण, मंत्रालय, भारत सरकार, यांनी आयोजित केलेल्या, एक दिवसीय जागृती आनंद मेळाव्यात, मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र, मुंबई व विसावा ज्येष्ठ नागरिक संघ, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आनंद मेळावा, नागरी निवारा सांस्कृतिक केंद्र, दिंडोशी, मलाड पूर्व, मुंबई येथे ज्येष्ठाच्या उपस्थितीत संपन्न झाला.
अँड.सामंत प्रभावळकर यांनी ज्येष्ठ्यांचे कायदे, अधिकार, इच्छापत्र, बक्षिस पत्र, मालमत्ता व संरक्षण या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.ज्येष्ठाना स्वाभिमानाने व सन्मानाने जगता यावे या करिता, शासनाने विविध कायदे केलेत, यावर ऍड.
प्रमोद ढोकळे यांनी मार्गदर्शन केले. दया मरण, इच्छा मरण, मेडिकल व्हील या बाबत सविस्तर माहिती दिली.
सोहळयाची सुरुवात, श्री गणेश वंदना व स्वागत गीताने झाली. विसावा ज्येष्ठ नागरिक संघ चे अध्यक्ष – हिंदुराव वाडते, चिटणीस – रमेश शेलार, कोषाध्यक्ष – रोहिदास बुद्धिवंत, कार्याध्यक्ष – सोनू वारंग, व कै यशवंत खंडेराव ‘ यांना “ज्येष्ठ जीवन गौरव पुरस्कारा” ने सन्मानीत करण्यात आले. कै खंडेराव यांचा पुरस्कार त्यांची पत्नी – शालिनी खंडेराव हिने स्विकारला.
तद प्रसंगी संकल्प ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव – सूर्यकांत सोडये व उपाध्यक्ष – शांताराम खामकर उपस्थित होते.मेळाव्याचे सूत्रसंचालन – निलिमा येतकर यांनी केले. आप्पा साहेब पाटील, मंगेश फटनाईक, बबन बोले व शैलजा बोन्द्रे यांनी फारच मेहनत घेतली होती.

Scroll to Top