
दहिवडी(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या माण – खटाव तालुक्याच्या राजकारणाला उंची मिळवून देणारे गोरे बंधू आहेत. त्यांच्या संघर्ष व एकोपा जनतेने अनुभवला आहे. आता मंगळागौरी पूजनच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये युवा नेते शेखरभाऊ भगवानराव गोरे हे पक्षप्रवेशाची हॅट्रिक करणार आहेत.
त्यांच्या पक्षप्रवेशाने सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यातील एक आक्रमक, लढाऊ आणि प्रभावी नेते सातारा जिल्ह्यात शिवसेनेला लाभणार आहे. ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आहेत. महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप आ. जयकुमार गोरे यांचे ते सख्खे बंधू आहेत. माण-खटावच्या राजकीय पटावर त्यांचा स्वतःचा मोठा स्वतंत्र जनाधार आणि स्वतंत्र गट आहे. शेखर भाऊ गोरे यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाच्या पक्षांमध्ये काम केले आहे आणि तालुक्यात आपली ताकद सिद्ध केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपल्या कामाची गती वाढवली. २०१६ मध्ये त्यांनी सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून विधान परिषद निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय राहिले.भाजपसोबत सहकार्य व युती करून भाजपचे कमळ फुलवले होते. गेल्या काही काळापासून ते भाजपसोबत आणि त्यांचे बंधू जयकुमार गोरे यांच्यासोबत महायुतीच्या कामात जोडलेले होते. नुकत्याच समोर आलेल्या घडामोडींनुसार, विधान परिषदेसाठी उमेदवारी डावलली गेल्याच्या नाराजीतून शेखर गोरे यांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे माण-खटावमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत
विधानसभा निवडणूक २०१४ (माण मतदारसंघ)या निवडणुकीत शेखर गोरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षातूनच त्यांचे बंधू जयकुमार गोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या अत्यंत चुरशीच्या लढतीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यावेळी जयकुमार गोरे ७५,७०८ मतांसह विजयी झाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेखर गोरे यांनी शिवसेनेच्या (अविभाजित) तिकिटावर निवडणूक लढवली होती. या तिरंगी लढतीत भाजपचे जयकुमार गोरे आणि अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्यात मुख्य लढत झाली, तर शेखर गोरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना ३७,५३९ मते मिळाली होती. सातारा जिल्हा बँक निवडणूक २०२१ (सहकार क्षेत्र)सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत त्यांनी माण सोसायटी मतदारसंघातून ‘शिवसेना’ गटाकडून एकाकी झुंज दिली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी मनोज पोळ (राष्ट्रवादी) यांनाही ३६ मते पडल्याने लढत टाय झाली होती. अखेर ईश्वर चिठ्ठी (ड्रॉ) काढली असता नशिबाने शेखर गोरे यांच्या बाजूने कौल दिला आणि ते विजयी झाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. परंतु २०२५ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना भाजपचे वरिष्ठ नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेला संधी दिली जाईल. असा शब्द दिला होता व शब्द पाळला नाही. राजकारणात शब्द पाळला जात नाही. त्यामुळे त्या प्रवृत्तीला धडा शिकवून व ताकद दाखवूनच शब्दमोड करावी लागते व त्याचा निकालही द्यावा लागतो. हे आता भविष्यात सिद्ध होईल का? याकडे आता उत्सुकता लागलेली आहे.
——–&———————–
फोटो – पक्षप्रवेश हॅट्रिक करणारे शिवसेना पक्ष इच्छुक शेखर भाऊ गोरे (छाया- निनाद जगताप दहिवडी)




