ताज्या बातम्या

साखरेच्या दरवाढीतही साताऱ्यातील कंदीपेढ्याची चव टिकून

सातारा( अजित जगताप ) : भारतात साखरेच्या दरात झालेली अचानक वाढ ही प्रामुख्याने उत्पादनातील घट, व्यापाऱ्यांची साठेबाजी, आणि सणासुदीच्या काळातील दरवाढ झाली असली तरी सातारा जिल्ह्यात कंदीपेढ्याच्या चव टिकून आहे.
भारतासारख्या कृषी प्रधान देशात साखरेचे उत्पादन ३४३ लाख टनांवरून सुमारे ३०६ लाख टनांपर्यंत खाली आली.कृत्रिम साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्या साखरेच्या व्यापाऱ्यांच्या गोदाम मध्ये साखर तपासणी होणे गरजेचे आहे. नेमका सणासुदीला सामान्य माणसाला आर्थिक झळ पोचवण्यासाठी काही व्यापारी वर्ग अशी साठेबाजी करतात.
गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी यांसारख्या आगामी सणांमुळे बाजारात साखरेची मागणी वाढली आहे. सध्या सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर सत्तेत आहेत.
साखरेचे दर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी आता गोड पदार्थांची ही दर वाढवले जाणार आहे. साताऱ्याचे प्रसिद्ध कंदी पेढे बनवण्यासाठी लागणाऱ्या साखरेचे प्रमाण हे इतर सर्वसामान्य पेढ्यांच्या तुलनेत कमी असते. त्यात खवा जास्त भाजला जातो (कंदी भाजणी) आणि साखरेचा वापर मर्यादित करून लाटकर व मोदी कंदी पेढे निर्मात्याने कधी पेढ्याची चव राखली आहे.
कंदी पेढे निर्मितीसाठी खव्यानुसार साखरेचे प्रमाण प्रति किलो१ किलो खव्यासाठी साधारणपणे ३०० ते ३५० ग्रॅम साखर वापरली जाते.जर इतर पेढे असतील तर त्यात अर्धा किलो पर्यंत साखर वापरली जाते. अस्सल सातारकर कंदी पेढ्यामध्ये साखरेचे प्रमाण पस्तीस टक्के पेक्षाही जास्त नसते. दुधापासून थेट पेढे बनवल्यास म्हशीच्या दुधासाठी: २ लीटर दूध आटवून साधारण ४०० ग्रॅम खवा तयार होतो. या प्रमाणासाठी फक्त ७० ते ८० ग्रॅम साखर पुरेशी ठरते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवव्या वंशजांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील खडकलाट (चिकोडीजवळ) या गावातून मिठाई बनवणाऱ्या काही कुशल कुटुंबांना साताऱ्यात आणून वसवले. या कुटुंबांना पुढे लाटकर आणि छत्रपतींकडून मिळालेल्या किताबावरून मोदी म्हणून ओळखले जाऊ लागले.या कारागिरांनी साताऱ्याजवळील कास पठार परिसरातील म्हशीच्या दुधाचा खवा वापरण्यास सुरुवात केली. आताच्या घडीला कास पठारावरील पशुधन कमी झाले आहे. तरीही गुणवत्ता टिकवण्यासाठी लाटकर व मोदी यांनी पारंपारिक व्यवसाय जपला आहे. साखरेच्या दरवाढीने पेढ्याचा गोडवा वाढला असला तरी ओरिजनल कंदी पेढ्याचा गोडवा आरोग्यास उपयुक्त आहे. एवढ्याच प्रमाणात साखर त्याच्यामध्ये असते. त्यामुळे ग्राहक वर्गाने ही कंदी पेढे घ्यायचे असेल तर साखरेचे प्रमाण किती व त्याचा रंग कसा? हे ठरवूनच कंदी पेढे खरेदी करावे. असे आवाहन नियमित कंदी पेढे खरेदी करणारे अँड. विलास वहागावकर, फलटणचे राजेंद्र रणदिवे, कराडचे भीमराव धुळप यांनी केले आहे.

—————————————
चौकट- अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून खूपच सुधारणा झाली आहे. ज्या दुकानांमध्ये मिठाईचे दर व त्याची मुदत लिहिलेली जाते. त्याच ठिकाणी खरेदी करावे. इतर ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता आहे.

______________________________

फोटो साताऱ्यातील मिठाईचा राजा असणारा कंदी पेढा व त्याची मुदत (छाया – अजित जगताप, सातारा)

Scroll to Top