ताज्या बातम्या

जंतरमंतर आंदोलन; खासदार चंद्रशेखर आझाद यांचे संसद परिसरात धरणे आंदोलन

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ला व गोळीबाराच्या निषेधार्थ खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संसद भवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली धरणे आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी रात्रीपासून ते भर पावसात आंदोलनस्थळी ठिय्या देऊन बसले असून, आंदोलनकर्त्यांना न्याय मिळावा आणि घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
चंद्रशेखर आझाद यांनी आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बलप्रयोग होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून पाठिंबा व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे संसद परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Scroll to Top