ताज्या बातम्या
शिवसेना शिवडी विधानसभा व वैद्यकीय मदत कक्षातर्फे के.ई.एम. रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांचा सत्कारराजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त निबंध स्पर्धा ! पत्रकार राजन पारकर यांनी पटकावला प्रथम क्रमांक ; काव्य स्पर्धेत अमित माने पहिलेमहिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी  ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरेहौसाई विद्यालयात गरीब विद्यार्थिनींना सायकल व ४० विद्यार्थ्यांना सँडल्सचे वाटप; शिक्षणासाठी समाजाने पुढे यावे – राजेश खराटेबल्लाळेश्वर सहकारी पतपेढीचा सभासद प्रशिक्षण सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

शिवसेना शिवडी विधानसभा व वैद्यकीय मदत कक्षातर्फे के.ई.एम. रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांचा सत्कार

मुंबई (शांताराम गुडेकर) : शिवसेना शिवडी विधानसभा आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने बृहन्मुंबई महापालिकेच्या गोरगरिबांच्या सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या परळ येथील के.ई.एम. रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिष्टमंडळाने डॉ. पाठक यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत रुग्णालयातील रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, उपचार सुविधा आणि वैद्यकीय सेवांबाबत चर्चा केली. रुग्णांना अधिक प्रभावी व सुलभ आरोग्यसेवा मिळण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याबाबतही सकारात्मक संवाद झाला.
या प्रसंगी महिला विभाग प्रमुख रेश्मा सकपाळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष जितेंद्र दगडूदादा सकपाळ, शिवडी विधानसभा प्रमुख कुणाल प्रभुणे, विधानसभा वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख गायत्री आंब्रे, महिला विधानसभा प्रमुख आकांक्षा गावडे, उपविभाग प्रमुख प्रफुल अहिरे, शाखाप्रमुख (२०३) मुकेश महाडिक, शाखाप्रमुख (२०५) संजय गोसावी तसेच महिला शाखाप्रमुख ऋतुजा खामकर (२०२), मनीषा रानवडे (२०३), स्नेहा शिर्के (२०४), दर्शना पवार (२०५), राणी जेनापल्ली (२०६) यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top