ताज्या बातम्या

नारीशक्तीच्या हस्ते साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा…….

सातारा(अजित जगताप) : सर्वसामान्य केंद्रबिंदू म्हणून वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सातारा राष्ट्रवादी भवन या ठिकाणी पक्ष ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, नरेश देसाई, नारीशक्ती व महिला पदाधिकारी अर्चना देशमुख अँड .रणजीत सिंह जगदाळे, प्रदेश महिला सदस्य सुमित्रा जाधव , शफिक शेख, वैशाली जाधव, सुनील गाडेकर, नलिनी जाधव,युवक जिल्हाध्यक्ष समीर राजेघाडगे, विकी शिर्के, उमेश जगदाळे, अतुल शिंदे संजय पिसाळ ,रोहित नवसरे, उद्धव बाबर व मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा खऱ्या अर्थाने माता-भगिनी सक्षमपणाने सांभाळत आहे. एवढेच नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये नारी शक्तीच्या विधायक दृष्टिकोनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खेड्यापाड्यात पोहोचला आहे. याचे सर्व श्रेय माता भगिनी कार्यकर्त्यांना असल्यामुळे राष्ट्रवादी भवन कार्यालयात प्रतिनिधीक स्वरूपात श्रीमती अर्चना देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीमध्ये अनेक राजकीय चढउतार व सत्तांतर पाहिलेले आहे. तरी आज सर्वसामान्य माणसांचे प्रश्नासाठी सत्ता नसतानाही सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे. आंदोलनाची धास्ती घेऊन अनेक निर्णय केंद्र व राज्य सरकारला बदलावे लागत आहेत. आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब, स्वातंत्र्य सेनानी किसन वीर आबा, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार विचारांचा वारसा जपणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रात राष्ट्रवादीची सत्ता निर्माण होईल. असा विश्वास युवा नेते अतुल शिंदे यांनी व्यक्त केला. या वेळेला गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करणारे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. ……………………………… फोटो– राष्ट्रवादी भवन सातारा येथे पक्ष ध्वजारोहण करताना श्रीमती देशमुख व सरचिटणीस राजकुमार पाटील अतुल शिंदे व मान्यवर (छाया- अजित जगताप, सातारा)

Scroll to Top