आळंदी :

अनुसूचित जाती अ ब क ड वर्गीकरणास चर्मकार समाजाचा विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून चर्मकार समाजाचे नेते आळंदी येथील हराळे वैष्णव धर्मशाळा (आळंदी देवाची) या ठिकाणी गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित होते. मा. समाज कल्याण मंत्री मा. बबनरावजी घोलप यांच्या अध्यक्षतेखाली समाजातील आजी, माजी.. खासदार .. आमदार त्याचबरोबर विविध संघटना संस्थेचे नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली. त्यावेळी अनेकांनी आपापली मते, सुचना मांडल्या. त्यानंतर काही निवडक ठराव मंजूर करण्यात आले.तसेच त्याप्रसंगी अॅड. आनंद गवळी लिखित आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे प्रकाशित “अनुसूचित जाती अ ब क ड वर्गीकरणास चर्मकार समाजाचा विरोध करणारी भूमिका” या पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.



