सातारा(अजित जगताप) : सातारा तालुक्यातील विशेषत: सातारा नगरपरीषद, कोंडवे, सैदापूर, हमदाबाद ,करंजे, दरे बुद्रुक, दरे खुर्द, गोडोली यवतेश्वर ,सांबरवाडी, व परिसरातील हददीतील नागरिकांसाठी शुक्रवार दिनांक ८ मे रोजी सकाळी दहा वाजता पोलीस करमणूक केंद्र तालीम संघ मैदान शेजारी, सातारा शहर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर आयोजित केले आहे. अशी माहिती सातारची उपविभागीय अधिकारी श्री आशिष बारकुल, व सातारा तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे. या शिबिराचा सर्व सातारा शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
सदर छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीरामध्ये महाराष्ट्र शासन महसुल विभाग तसेच विविध विभागाचे अत्यावश्यक शासकीय प्रमाणापत्रासह विविध लाभांचे वितरण करण्यात येणार आहे . सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्याचे अप्पर मुख्य सचिव मा श्री विकास खारगे व सातारा जिल्हाधिकारी मा श्री संतोष पाटील , हे उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहवे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे. उपविभागीय अधिकारी, सातारा तहसीलदार त्याचबरोबर मंडलधिकारी तलाठी, महसूल विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
या शिबिरासाठी सातारा नगरपालिका, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, वन विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभाग ,नगर भूमापन, भूमि अभिलेख, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, जीवन प्राधिकरण, महिला बचत गट, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग, संजय गांधी निराधार योजना, वीज वितरण कंपनी, सातारा पंचायत समिती, खाजगी सहकारी बँक तसेच शासकीय इतर कार्यालयातील प्रतिनिधी- अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असणारे सर्व कागदपत्र तातडीने जागेवर उपलब्ध होणार आहेत. विविध दाखले वाटप सातबारा अद्यावत करणे सर्वांसाठी गरज अंतर्गत पट्टी वाटप ई मोजणी पाणंद रस्त्याबाबत कार्यवाही, ई मोजणी अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क ऍग्रो स्टॅक पी एम किसान प्रलंबित फेरफार निकाली तुकडेबंदी कायद्याच्या अनुषंगाने कार्यवाही सामाजिक अर्थसाह्य योजनेचा लाभ लोकसेवा हक्क कायदा तात्काळ सेवा अशा स्वरूपाची कामे होणार आहेत. यामुळे वेळ व खर्चाची बचत होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे. यासाठी संपूर्ण जय्यत तयारी सुरू केली आहे.




