मुंबई(रमेश औताडे) : राज्यातील एस टी परिवहन सेवेतील परीक्षा उत्तीर्ण वाहक चालक गेल्या चार दिवसापासून आझाद मैदानात आंदोलन करत आहोत. सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करावा अशी मागणी राष्ट्रीय कर्मचारी सेना या संघटनेचे महाराष्ट प्रदेश सचिव देवानंद गरुड यांनी केली आहे.
सन २०१९ साली सरळ सेवा भरती प्रक्रियेत चालक तथा वाहक पदाची भरती प्रक्रियेत चालक तथा वाहक पदाची भरती करण्यात आली. पैकी २८६१ पात्र उमेद्वारांना रा.प. सेवेत सामाऊन घेणेबाबत सन २०२२-२३ पासून सदर उमेद्वार पाठपुरावा करत आहेत. त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
सन २०१६-१७ च्या सरळ सेवा भरती मधील अतिरिक्त व पुरवणी यादीवरील चालक तथा वाहक उमेद्वारांना सन २०२४ मध्ये रा.प. सेवेत सामाऊन घेतले आहे. त्याप्रमाणे सन २०१९ मधील अतिरिक्त यादीमधील उमेद्वारांना रा.प.सेवेत सामाऊन घेतले आहे. त्याप्रमाणे पुरवणी यादीतील उमेद्वारांना रा.प. सेवेत कंत्राटी कामगार भरतीची मंजुरी देण्यापुवी सन २०१९ च्या उमेद्वारांना सेवेत सामाऊन घ्यावे. नुसार २६९ चालक तथा वाहक पदाच्या जागा सोलापूर विभागात रिक्त आहेत. महाराष्ट्रात ४६१९ जागा रिक्त आहेत त्यानुसार वरील २८६१ उमेद्वार रा.प. नियमाप्रमाणे सर्व लेखी वैद्यकिय व वाहन चालन चाचणी परिक्षा पास झाले आहेत. करिता यांना रा.प. सेवेत सामाऊन घेऊन त्यांना नैसर्गिक न्याय द्यावा अशी मागणी देवानंद गरुड यांनी केली आहे.




