सातारा

(अजित जगताप) : समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही समाजावर असते. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस दलात अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी होऊन गेले. त्यांच्या कर्तबदारीने खऱ्या अर्थाने लोकशाही सुदृढ झाली होती. आता मात्र पोलिस यंत्रणाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करण्यात येत आहे. अशा कालावधीमध्ये प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या आठवणींना चांगला उजाळा मिळत आहे. सातारा जिल्ह्याचा विचार केला तर खऱ्या अर्थाने आय.पी.एस. अधिकारी अशोक कामठे, मीरा बोरवणकर, एम एम मलिकार्जुन प्रसन्ना, संदीप पाटील, अभिनव देशमुख, सुरेश खोपडे, समीर शेख, चंद्रकांत कुंभार, प्रकाश पवार, तेजस्वी सातपुते अशा अनेक अधिकाऱ्यांची व पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेतली जातात. सध्या राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात पोलीस दलाचा हस्तक्षेप होत असल्याने पोलीस दलाची विश्वासार्हता कमी झालेली आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेला प्रकार हा कोणत्या लोकशाहीमध्ये बसतो? अशी आता भाजप राज्यकर्त्यांना विचारणा होऊ लागलेली आहे. मंत्री महोदयांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याला दमदाटी आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडल्यामुळे शरमेने खाली मान घालावी वाटत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मनोज पाटील, विश्वास पांढरे, बी. आर .पाटील, नानासाहेब पन्हाळकर, रामदास शिंदे, राजेंद्र मोकाशी, मालोजीराव देशमुख, किशोर धुमाळ व अनेक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी होऊन गेले. त्यांनी कधीही अन्याय अत्याचार केला नाही किंवा राजकीय पक्षाचे मांडलिकत्व पत्करले नाही. पण, अलीकडच्या काळामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षाही काकणभर सरस अशी कामगिरी काही पोलीस अधिकारी वर्ग सामुदायिकरित्या भाजप सत्ताधाऱ्यांसाठी करत आहे. त्याचा फटका महायुतीतील दोन मंत्र्यांना सुद्धा बसला आहे. याबाबत अद्यापही कुणीही आपली बाजू मांडणारा खुलासा केला नाही.
आज भाजपची निर्विवाद सत्ता असल्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कारभारी याबाबत तोंडी व लेखी तक्रार आहे. सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. आता हा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला गेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याची अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली आहे. राजकीय महत्त्वकांक्षीमुळे सर्व लोकशाहीची तत्व गुडाळण्यात आलेले आहेत. याला मोठ्या अक्काचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाने यापूर्वी केलेल्या कामगिरीची अनेकांना आठवण होत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर राज्याचे मुख्यमंत्रीपद जेव्हा सातारा जिल्ह्यात होते त्यावेळेला पोलीस अधीक्षक यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या नजीक असलेल्या कार्यकर्त्याच्या पोलीस अधिकारी जावयाला चांगली पोस्टिंग मिळावी. असा कार्यकर्त्याने आग्रह केला. तसा पोलीस अधीक्षक यांना निरोप सुद्धा गेला परंतु त्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. कराड येथील एका कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षक एकत्र आल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी आठवण करून दिली. त्यावेळेला कडक सलाम करून एस. पी. एम एम प्रसन्ना यांनी ठणकावून सांगितले, अगला एस.पी. आयेगा .. वो पहिला यही काम करेगा.. असे सांगून ते निघून गेले. आता असाच कडक सलाम व धमक असणारा एस. पी. राहिले नाही. अशी खंत वाटत आहे. सध्या सामान्य माणसांवर अन्याय होत असल्याने पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्याबाबत तक्रार होऊन सुद्धा त्याला पाठीशी घातले जात आहे. बेकायदेशीर धंद्याचे हप्ते वाढले वाढवले जात आहे.
तात्कालीन सातारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी राजकीय पटलावर चमकणाऱ्या गुंडांचे फ्लेक्स लावून जनतेला सावध केले होते. आता भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याचे पुरवण्या निघत आहेत. त्यांना सिंघम बनवले जात आहे .अशी आता महायुती तील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सुद्धा खंत व्यक्त केली आहे. दिसतं तसे नसते म्हणून जग फसते. भाजप पक्ष हा नीतिमत्ता व विचारांवर चालणारा पक्ष आहे. या सर्व गोंधळामध्ये कुठेही निष्ठावंत भाजप कार्यकर्ता नाही. त्याचा आम्हाला समाधान आहे. असे काहींनी सांगितले. दरम्यान, सातारा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल सामान्य माणसांना आशा आहे. ज्यांनी कर्तव्यदक्षतेने प्रामाणिक काम केले आहे. करत आहेत .त्यांना आजही कायदा व सुव्यवस्था राखणारी सातारकर सन्मानाने आठवण काढून सलाम करत आहे. हे यातून स्पष्ट झाले. पोलिसांबद्दल समाजामध्ये आदर युक्त दहशत असणे गरजेचे आहे. कमी होत असेल तर त्याचा पोलीस दलाने विचार करावा अशी मागणी पुढे आलेली आहे. _______________________________. फोटो — कर्तव्यदक्षता व पोलीस दलाची मान उंचावण्याच्या काम करणारे पोलीस अधिकारी एम एम प्रसन्ना व मनोज पाटील यांच्यासह पत्रकार आणि मंत्री आमदार (संग्रहित छायाचित्र)




