ताज्या बातम्या

महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसलाच मतदारांची पसंती – संजय गायकवाड

महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गट व गणामध्ये सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार वेग घेत असला, तरी मतदारांची स्पष्ट पसंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच असल्याचे जनतेशी संवाद साधताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ निवडणुकीच्या काळातच सक्रिय होणारा पक्ष नसून, तो नेहमीच जनतेच्या सुख-दुःखात सहभागी असतो, हेच या विश्वासाचे प्रमुख कारण असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आजवर एकहाती सत्ता राहिली असून, ती केवळ राजकारणासाठी नव्हे तर विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामामुळे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी संकटकाळात नागरिकांच्या मदतीला धावून जातो, याची अनेक जिवंत उदाहरणे या तालुक्याने अनुभवली आहेत.
निवडणुकांच्या तोंडावर केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा जनता आपला स्विकार करत आहे, यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो, असेही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील हे या तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत असून, त्यांच्या कार्यामुळे जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेसवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
कांदाटी परिसरातील दुर्गम भागांमध्ये प्रचारादरम्यान नागरिकांकडून स्पष्ट प्रतिक्रिया उमटत असून, “आजच्या प्रचारात आम्हाला महागड्या गाड्या, पिकनिकसाठी आल्यासारखे प्रचारक दिसत आहेत; मात्र आमच्या अडचणीच्या वेळी चालत आलेले, बोटीने पोहोचलेले आणि खऱ्या अर्थाने मदतीला धावून आलेलेच आमचे हक्काचे उमेदवार आहेत,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या मायमाऊलीच्या आशीर्वादामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हक्काची बनत चालली असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top