ताज्या बातम्या

तळदेव जि. प. गटात मा. शिंदे साहेबांचे विकासात्मक काम निर्णायक ठरणार

महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री, कोयनेचे सुपुत्र मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी गेल्या पाच वर्षांत महाबळेश्वर–तापोळा विभागात राबवलेली भरीव विकासकामे येणाऱ्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. विकासाभिमुख धोरण हीच शिवसेनेची खरी ओळख असून ती शिंदे साहेबांच्या कामातून ठळकपणे दिसून येते.
मा. शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेली प्रमुख विकासकामे पुढीलप्रमाणे :
१) महाबळेश्वर–तापोळा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाबळेश्वर–तापोळा मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण मा. शिंदे साहेबांच्या पुढाकाराने पूर्ण झाले. यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित व जलद झाली आहे.
२) तापोळा परिसरातील पूल प्रकल्प तापोळा–आहिर, तापोळा–आपटी, बामणोली–दरे, आकलपे–मोरणी या ठिकाणी भव्य पूल उभारण्यात आले आहेत. पाण्यातून होणारी धोकादायक वाहतूक थांबून आता सुरक्षित व कायमस्वरूपी दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
३) पाचवड–खेड जोड रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ व मुंबई–गोवा महामार्गाला जोडणारा पाचवड–खेड रस्ता या विभागासाठी वरदान ठरला असून व्यापार, पर्यटन व दळणवळणाला मोठी चालना मिळाली आहे.
४) रस्त्यांचे विस्तृत जाळे पूर्वी अतिशय निकृष्ट असलेले रस्ते आणि अनेक गावांना नसलेली रस्ते सुविधा आता बदलली आहे. प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि डोंगरमाथ्यावरील वस्त्यांपर्यंत डांबरी रस्ते पोहोचले आहेत.
५) कोरोना काळात व अतिवृष्टीत मदतीचा हात कोरोना काळात तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला मा. शिंदे साहेबांनी सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात दिला.
६) श्री उतेश्वर मंदिर विकासासाठी १३६ कोटी प्रसिद्ध व जागरूक श्री उतेश्वर देवस्थानास पर्यटन दर्जा देत १३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून भव्य मंदिर उभारणीचे काम सुरू आहे.
७) बांबू लागवड अभियान शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड अभियान सुरू करण्यात आले. याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना झाला असून रोजगाराचे नवे साधन निर्माण झाले आहे.
८) मोऱ्या व लहान पुलांची कामे रस्ता रुंदीकरण व अतिवृष्टीत वाहून गेलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीत मोठ्या मोऱ्या व छोटे पूल बांधून कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
९) मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग कोयना जलाशय परिसरात पर्यटन विकासासाठी मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग सुरू करण्यात आले आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला असून पर्यटनात लक्षणीय वाढ झाली आहे.
१०) प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी १७० कोटी महाबळेश्वरची ऐतिहासिक ओळख असलेल्या प्रतापगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश करून संवर्धनासाठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या सर्व विकासकामांमुळे विभागातील जनता समाधानी असून, “साहेबांनी केलेल्या कामांवर विश्वास ठेवूनच मतदान करू,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे तळदेव जि. प. गटात मा. शिंदे साहेबांचे विकासकार्य निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top