ताज्या बातम्या

१०५ गावांच्या, समन्यायी पाणीवाटप प्रकल्पाची प्रत्यक्ष अम्मलबजावणी मार्च पर्यंत सुरु न झाल्यासा बेमुदत आंदोलन

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे) गुढे पाचगणी येवती उपासा सिंचन योजनेचा आराखडा मंजूर होऊन येत्या मार्च पर्यंत निधीची तरतूद झाली नाही तर सिंचन भवन कोल्हापूर येथे लढा सुरु करणार, जोपर्यंत निधी दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष आणि समान पाणी वाटप चळवळीचे नेते डॉ भारत पाटणकर यांनी बोलताना दिला, ते मराठेवाडी ता.शिराळा येथे श्रमिक मुक्ती दलाचे वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
यावेळी शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती हणमंतराव पाटील,निमंत्रक वसंत पाटील,श्रमुद सदस्य उदय पाटील,सखाराम पाटील बाळासाहेब माने,सचिन मोरे संदीप पाटील,विजय पाटील सदाशिव नावडे,पोपट गुरव शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.पाटणकर पुढे म्हणाले की या विभागातील शेतीला पाणी आले तरच मुबईला असणाऱ्या तरुणांचा लोंढा गावाकडे वळेल.यासाठी ठरवलेल्या नियोजना नुसार सर्वाना समान पाणी मिळावे,ही योजना नियोजन ठरल्या प्रमाणे व्हावी अशी आमची सुरुवातीपासून मागणी आहे.यात अडथळा आला तर तीव्र आंदोलन उभारूअसा इशारा दिला
यावेळी हणमंतराव पाटील,वसंत पाटील,बाळासो माने,सचिन मोरे,उदय पाटील,संदीप पाटील सरपंच पै.बंडा पाटील, विजय पाटील,बाळासो मिरुखे आदिची भाषणे झाली.
श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने २३मार्च ला वन्यप्राणी बंदोबस्त आणि चांदोली अभयारण्या मुळे बाधित प्रश्न साठी कोल्हापूर वन्यजीव कार्यालयावर मोर्चाने जाणार.
तर एप्रिल२०२६ पासून गुढे पाचगणी येवती योजनेतील १०५गावातील शेतकरी आणि वारणा प्रकल्पग्रस्त आपल्या प्रश्नासंदर्भात आंदोलन सुरु करणार असा ठराव सर्व शेतकऱ्यावतीने करण्यात आला.
फोटो ओळ : मराठेवाडी ता.शिराळा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना डॉ.भारत पाटणकर.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top