प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ अंतर्गत वार्ड क्रमांक १५५ मधून सौ. वर्षा श्रीकांत शेट्ये यांनी भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीनंतर पक्षातील तीन विद्यमान पदाधिकारी आणि एका माजी नगरसेविकांनीही अर्ज दाखल केले होते. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करत या चारही जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत सौ. वर्षा श्रीकांत शेट्ये यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवारांनी देखील आपला अर्ज मागे घेत सौ. वर्षा श्रीकांत शेट्ये यांना उघड पाठिंबा दिल्याने त्यांच्या उमेदवारीला आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे या वार्डात राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होत असून निवडणूक लढतीला वेगळे वळण मिळाले आहे.
या वार्डातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती, तसेच वंचित–काँग्रेस आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मात्र सध्या अनेक सामाजिक संस्था, स्थानिक मंडळे आणि नागरिकांनी सौ. वर्षा श्रीकांत शेट्ये यांना जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड वाटत आहे.
माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांनी केलेल्या विकासकामांमुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्याच विकासाच्या धर्तीवर त्यांच्या पत्नी सौ. वर्षा श्रीकांत शेट्ये यांनाच संधी देण्याचा मतदारांचा कल असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक १५५ मध्ये सौ. वर्षा श्रीकांत शेट्ये यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.




