नेरळ : हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुध्द लढताना 2 जानेवारी 1943 रोजी सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी 2 जानेवारी रोजी दरवर्षी कर्जत तालुक्यातील मानिवली हुतात्मा स्मारकात या हुतात्मांना अभिवादन करण्यात येते यावर्षीही शुक्रवार दि 2 जानेवारी रोजी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी सर्वांना आवाहन वजा विनंती केली की, देशासाठी बलिदान देणा-या या शुरवीरांना वर्षातून एकदा मानवंदना देण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे. आज आपल्या परिसराचे आणि गावाचे जे नाव देशाच्या नकाशावर ठळकपणे ओळखले जाते ते हुतात्मा भा ई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील आणि त्यांच्या सर्व सहका-यांच्या बलिदानामुळे आणि म्हणून प्रत्येक तरूणाने आणि येथील नागरीकांनी प्रत्येकवर्षी या दिवशी मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहिले पाहिजे तसेच या शुरवीरांच्या बलिदानाचा आपणास कधीही विसर पडता कामा नये.
हुतात्मा वीरभाई कोतवाल व हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचा स्मृतीदिन गुरूवाद दि. 1 जानेवारी रोजी जिल्हा परिषद शाळांमधील विद्याथनी संस्कृतीक कार्यक्रम, देशभक्तिपर गीते सादर केली. शुक्रवार दि 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समिती कर्जत, ग्रुप ग्रामपंचायत मानिवली, हुतात्मा स्मारक समिती व केंद्र दहीवली- मालेगाव यांच्या विद्यमाने मानिवली येथील स्मारकाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे व अन्य मान्यवरांच्या हस्ते वीर हुतात्मा वीरभाई कोतवाल, हिराजी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हुतात्म्यांच्या नातेवाईकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.योवळी जिल्हा परिषद शाळांमधील सर्व केंद्रातील शिक्षकांनी ज्योत स्मारकात आणून हुतात्यांना मानवंदना दिली.
यावेळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्यांचे नातेवाईक, तहसिलदार, धनंजय जाधव, पोलिस निरिक्षक राहूल वरोटे, स्मारक समितीचे अध्यक्ष प्रविण डायरे तसेच अरविंद पाटील, मनोहर डायरे, जितेंद्र गवळी, लहू डायरे, अमर मिसाळ, अनिल जोशी, शिवराम बदे,शिवराम भोईर, विजय हजारे, केशव तरे तसेच अन्य मान्यवर शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.




