ताज्या बातम्या

शेती व घरांच्या सुरक्षेसाठी घावरीत सौरऊर्जा कुंपणाची उभारणी

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील घावरी येथील एका छोट्या गावात जंगली जनावरांमुळे शेतीसह घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर शेतीच्या सुरक्षेसाठी सौरऊर्जा कुंपण उभारण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश कि. सकपाळ यांच्या पुढाकाराने हा विषय मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. याला बाळकृष्ण भगवान सकपाळ, तानाजी लक्ष्मण सकपाळ, रमेश गणपत सकपाळ, गोरेगाव शाखाप्रमुख किसन शांताराम जाधव, कार्याध्यक्ष सावजी तुकाराम सकपाळ, बाळकृष्ण रामचंद्र सकपाळ, वसंत मालू सकपाळ तसेच माजी अध्यक्ष महादेव तुकाराम सकपाळ यांनी सक्रिय पाठिंबा दिला. ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ सदस्यांच्या सहकार्याने तसेच श्रमदानातून सलग सात दिवस चिकाटीने काम करून सौरऊर्जा कुंपण उभारण्यात आले.

या उपक्रमात उपसरपंच श्री. विजय सावजी सकपाळ, श्री. राजाराम धारू सकपाळ, माजी पोलिस पाटील नामदेव रामचंद्र सकपाळ, नारायण हरिश्चंद्र सकपाळ, महादेव तुकाराम जाधव, विठ्ठल धोंडू कदम, सोमाजी कोंडीबा सकपाळ, कोंडीबा शांताराम जाधव, आनंद राजाराम सकपाळ, विठ्ठल धोंडू सकपाळ, विष्णू कृष्णा सकपाळ आणि आनंद देवजी सकपाळ यांच्या संपूर्ण टीमने अहोरात्र मेहनत घेतली.

या सौरऊर्जा कुंपणासाठी शेलार अग्रोटेक यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे जंगली जनावरांपासून शेती व घरांचे संरक्षण होणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top