प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबईतील सागर या निवासस्थानी भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी नाथाभाऊ शेवाळे यांनी महायुतीच्या उमेदवारांना जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विजयासाठी प्रयत्न करतील असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
भेटी दरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा साहेब यांनी श्री. फडणवीस यांना दूरध्वनी द्वारे पाठिंब्याबाबत चर्चा केली. तसेच श्री. शेवाळे यांनी याअगोदर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली होती.
यावेळी या शिष्टमंडळात प्रधान महासचिव अजमल खान, सरचिटणीस निलेश कंतारिया, संजय बारवकर, अॅड. बापूसाहेब देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.