ताज्या बातम्या

महामानव महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत भोजन सेवेतून साताऱ्यात झाले अभिवादन…

ातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण ज्या प्रतापसिंह हायस्कूल, साताऱ्यात झाले. त्या साताऱ्यामध्ये भोजन सेवा करून आंबेडकर अनुयायांनी त्यांच्या विचारांना सलाम केला . या वेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच विधायक उपक्रमाचे कौतुक केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे खऱ्या अर्थाने गावकुसाबाहेरील लोकांना सन्मान स्वाभिमान व लोकशाही मधील समतेचा आहार प्राप्त झाला आहे. आज जे काही आहे ते डॉ. आंबेडकरांची देणं आहे. या भावनेतून सातारा शहरात आंबेडकर अनुयायांनी ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळा व प्रतिमेला विविध ठिकाणी विनम्र अभिवादन केले. शैक्षणिक क्रांती घडल्यामुळे खऱ्या अर्थाने समाजाला शिका- संघटित व्हा आणि संघर्ष करा असा आत्मविश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. यावेळी प्रा. अरुण गाडे, ,वामन मस्के, कामेश कांबळे, अनिल वीर, सौ सुवर्णाताई पाटील, प्रज्वल मोरे, महेश गाडे, मच्छिंद्रनाथ जाधव, मदन खंकाळ, प्रवीण धसके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आज राजकीय पक्षांपेक्षाही मोठ्या प्रमाणात राजकीय पटलावर सामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आपली भूमिका बजावत आहेत. लोकशाहीचे तसेच आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहे. राजकीय मतभेद असू शकतात. परंतु ,मानवतावादी दृष्टिकोन ठेवून एकमेकांना सन्मानाची वागणूक देणे. हा लोकशाहीचा खरा अर्थ आहे. टीकाटिपणी टाळून आपल्या बांधवांच्या प्रगतीसाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा. अशी अनेकांनी भावना व्यक्त केली. यावेळी पॅंथर चळवळीपासून ते आंबेडकरी चळवळीपर्यंत अनेकांची उपस्थिती प्रेरणादायक ठरली होती.
सर्व जाती धर्मातील सुशिक्षित वर्ग सध्या भारतीय राज्य घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने प्रभावित झालेले आहे. दोनच राजे इथे जन्मले.. एक त्या रायगडावर.. एक त्या चवदार तळ्यावर असा नारा दिला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष होत आहे. आज हाच धागा पकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व जाती धर्मातील गरजू- गरीब- कष्टकरी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आंबेडकर अनुयायांच्या वतीने न्यायालयीन सेवानिवृत्त वर्ग दोन अधिकारी सौ. कल्पना जगताप, सौ.साक्षी शेलार – वहागावकर,अजित जगताप,आ समीर वहागावकर , सामाजिक कार्यकर्ते अमोल इंगवले, श्री कांबळे आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या वतीने मोफत भोजन सेवा पुरवण्यात आली. तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महिला आंबेडकर अनुयायांनी भीम गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
संजीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्था सातारा यांच्या वतीने श्री रवींद्र कांबळे यांच्या विधायक उपक्रमाला साथ म्हणून ही भोजन सेवा कार्यान्वित झालेली आहे. त्याचा अनेकांनी लाभ घेतला. महामानवाच्या विचाराप्रमाणे अनुकरण करणे. हे आद्य कर्तव्य आहे. सोशल मीडिया व बॅनरबाजी तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमापेक्षाही माणुसकी धर्म पाळण्याची शिकवण देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या प्रज्ञा शील करुणा आणि मैत्रीपूर्ण भाव जपण्याचे काम होत आहे. या वेळेला भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, विविध राजकीय पक्ष, संघटना आणि सातारा नगरपालिका जिल्हा प्रशासन पोलीस दल व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळेला मोठ्या प्रमाणात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी वैचारिक ग्रंथांची खरेदी करण्यात आली.

——————————

फोटो – महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना मान्यवर व भोजन सेवा (छाया– निनाद जगताप, सातारा)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top