ताज्या बातम्या

गुढे पाचगणी व येवती उपसा सिंचन योजनेच्या सर्वे चे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कोल्हापूर येथील कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार: डॉ. भारत पाटणकर

उंडाळे(वार्ताहर) गुढे पाचगणी व येवती उपसा सिंचन योजनेच्या उरलेल्या गावांचा सर्वे लवकरात लवकर पूर्ण करावा, त्याचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी नाशिक येथे पाठवण्यात यावे त्यानंतर ते मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवण्यात यावे, ही सर्व कामे जर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झाली नाही तर 12 जानेवारीला भव्य मेळावा घेऊन 26 जानेवारीला कोल्हापूर येथील पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला, घोगाव ता कराड येथे संतकृपा मंदिरात पाणी संघर्ष समितीच्या वतीने पार पडलेल्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते, यावेळी माजी सभापती हणमंत पाटील, उदय पाटील, बाळासाहेब माने, वसंत पाटील, सचिन मोरे, सखाराम पाटील ,प्रकाश काळे, सरपंच डांगे सर, मारुती देसाई, येळगावच्या सरपंच डॉ. अनुराधा माने यांच्यासह कराड तालुका, शिराळा आणि पाटण तालुक्यातील वाड्यावरस्त्यावरील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ,यावेळी बोलताना पाटणकर म्हणाले की, तुम्ही लोकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे तुम्हाला वाटत असेल की सर्वे झाला म्हणजे योजना पूर्ण झाली त्यासाठी तुम्हाला सारखा पाठपुरावा करावा लागेल त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, हे पाणी तुमच्या हक्काचं पाणी आहे, कोणत्याही राजकीय पुढारी किंवा आदानी किंवा टाटा बिर्लाचे नाही, त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, तुमच्या या संघर्षां सोबत नेहमीच मी तुमच्यासोबत असेन, देशाला स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ 78 वर्षे झाली एवढ्या वर्षात आपल्या डोंगर पठारावर शेतीला सिंचनाची सोय नाही, पावसाळ्यात मात्र धो धो पाऊस पण उन्हाळ्यात मात्र प्यायला पाणी नाही, तर सिंचनासाठी तर दूरच अशी अवस्था आहे. त्यासाठीच आपण जो लढा उभा केला आहे, त्या लढ्याला आता यश येत आहे, मात्र त्यासाठी आपण जागरूक राहणे तितकेच गरजेचे आहे, शासनाने या कामासाठी 1 कोटी 65 लाख 42 हजार एवढा निधी मंजूर केला आहे, ड्रोन ने मोजणी सुद्धा केली आहे परंतु अजूनही यामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांचा सर्वे अद्याप झालेला नाही, त्यासाठी उरलेल्या गावांचा सर्वे करून प्लॅन इस्टिमेट काढून ते मंजुरीसाठी मंत्रालय पाठवण्यात यावे, ही सर्व कामे जर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झाली नाही तर, 12 जानेवारी दिवशी भव्य मेळावा घेऊन 26 जानेवारीला वारणा धरणावरून कोल्हापूर येथील अधीक्षक ऑफिसवर भव्य असा लॉंग मार्च काढून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ भारत पाटणकर यांनी दिला, यावेळी 106 गावातील कराड तालुक्यातील पाटण तालुक्यातील शिराळा तालुक्यातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top