तळमावले (वार्ताहर) : संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पिंपळपानावर चित्र साकारत त्यांना विनम्र अभिवादन केले आहे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी.
विविध माध्यमातून कलाकृती रेखाटण्यात माहीर असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी पिंपळपानाचा नको असणारा भाग कापून गौतम बुध्द यांची हुबेहुब कलाकृती साकारली आहे. या कलाकृतीने सर्वांनाच भुरळ घातली आहे. पिंपळाच्या पानावर चित्र रेखाटण्यासाठी पिंपळाचे पान, पेन्सिल, ऑपेरेशन ब्लेड, इ. साहित्याचा वापर करण्यात आला आहे. डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कलाकृती रेखाटत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या चित्रांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकाने घेतली आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांनी पिंपळपानावर साकारली गौतम बुध्दांची प्रतिमा
RELATED ARTICLES