कराड (विजया माने) : प्रत्येक वर्षी 5 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत यंदा कराड शहरात एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, कराड नगरपरिषद, तसेच इतर सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रबोधनात्मक सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.
या रॅलीचा शुभारंभ माननीय श्री. सुरेश बाबा भोसले (कुलपती, कृष्णाविश्व विद्यापीठ) यांच्या हस्ते होणार असून, गुरुवार दिनांक 5 जून रोजी सायंकाळी 5 वाजता कराड येथील दत्त चौक येथून सुरुवात होईल.
रॅलीचा मार्ग – दत्त चौक → चावडी चौक → कन्याशाळा → नगरपालिका → डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा → कॉटेज हॉस्पिटल → आणि समारोप छत्रपती शिवाजी उद्यान येथे होईल.
या रॅलीद्वारे पर्यावरण संरक्षण, हरित वाहतुकीचे महत्त्व, आणि प्रदूषणमुक्त जीवनशैली याचा संदेश देण्यात येणार आहे. कराडकरांनी मोठ्या संख्येने स्वतःची सायकल घेऊन या उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. “सायकल चालवा, पर्यावरण वाचवा” या संकल्पनेला पुढे नेत ही रॅली केवळ एक प्रवास नसून, हरित भविष्याच्या दिशेने एक पाऊल असेल.